।। गुरुतत्त्वाचार ।।
२६/१२/२०१९
आनंद व गुरुप्राप्ती साठी, दहा पायऱ्यांचे अवलोकन !
(गुरुतत्त्वाचार हे सदर आपण सुरू केल्या पासून नियमित पणे आपण वाचत आहात, आपल्याला ते आवडत आहे, ते आपल्या अभिप्राय वरून कळत आहे.बऱ्याच जणांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतोय की गुरू करायचा का? आपण गुरू करू शकत नाही तर आपण शिष्य म्हणून आपली पात्रता वाढवू शकतो )
(दहावी पायरी त्याग)
आपल्या जीवनात आनंद येण्यासाठी व गुरुप्राप्ती होण्यासाठी म्हणजेच आपली शिष्य म्हणून पात्रता होण्यासाठी कशाप्रकारे साधना व्हायला हवी या साठी आता पर्येंत आपण दहा पायऱ्या बघितल्या त्या कुठल्या थोडक्यात बघूया.
१.प्रारब्धा चा स्वीकार करणे.
मला होणारा त्रास हे माझे प्रारब्ध आहे.त्यासाठी दुसरा कोणीही जवाबदार नाही. हे मान्य करून. मनाला शरीरावर होणाऱ्या त्रासातून दूर करणे.
2.चांगले क्रियामान कर्म करणे,
शरीराला होणारा त्रास प्रारब्धाने होतो,मन मात्र त्यात अडकत असल्यामुळे मानसिक त्रास होतो, जीवनाचा खरा अर्थ परमार्थ आहे . मग त्यासाठी प्रयत्न पूर्वक मनाला या चांगल्या कर्माकडे वळविणे
3.सात्विक आचरण.
चांगले क्रियामान करीत असताना, आपले आचरण सुद्धा सात्विक राहण्यासाठी प्रयत्न पूर्वक करावे लागेल , आचरणाला खूप महत्व आहे.
4.मन प्रसन्न ठेवणें
वरील ती गोष्टी जर प्रामाणिक पणे आपण केल्या तर ,मन प्रसन्न ठेवता येईल. मन प्रसन्न ठेवणे हेच साधनेचे साध्य असते. मन हेच ईश्वरा कडे घेऊन जाते किंवा रसातळाला घेऊन जाते
5. साधना मार्ग
ईश्वराकडे घेऊन जाणारे मुख्य चार मार्ग आहेत, आपल्या प्रकृती नुसार एक मार्गावर सुरुवात करावी,त्या मार्गावर साधना करीत शिष्य होण्यासाठी पात्रता वाढते,
6.गुरुप्राप्ती साठी प्रयत्न
कश्या प्रकारे जीवनात गुरू येतील, यासाठी शरीर , मन बुद्धी वापरून साधना सर्वेतो परी साधना करणे
7.चिंतन
चिंतानाला दुसरा कुठलाही पर्याय नाही. चितनानेच आपले गुण दोष कळून येतात. चितनानेच मन साधनेत स्थिर होत.
8.मनासाठी साधना नामस्मरण
ज्या संतांचे तत्त्व आपल्याला मनापासून आवडते ते आपल्या जीवनात आणण्यासाठी त्यांनी दिलेले नाम किंवा त्यांचे नामस्मरण करावे. याने मन स्थिर होते
9.शरीराने करायची साधना म्हणजे सतसेवा .
सतसेवेने अहं व अहंकार दूर होतो, अंगी नम्रता येते, हातून ईश्वराच्या निर्गुण स्वरूपाची सेवा घडते.
10. त्यागाला परमार्थात फार महत्व आहे.
आसक्ती दूर होणे म्हणजे त्याग, तण, मन, धन एवढेच नव्हे तर ईश्वरी कार्या साठी सर्वस्व वाहने हा त्याग आहे
अश्या 10 पायऱ्या आपण बघितल्या , या पायऱ्या जस जश्या आपण चढत जाऊ तास तशी आपली अध्यात्मिक प्रगती होत जाईल. अध्यात्मिक प्रगती म्हणजे काय तर चिरंतन टिकणारा आनंद प्राप्त होणे यासाठी गुरुतत्त्व मार्गदर्शकाची जीवनात खूप गरज असते. या साधने मुळे मार्गदर्शक गुरू म्हणून आपल्या जीवनात येतील.मग सर्वात महत्वाचा गुण आपल्यात असणे फार गरजेचे असते तो म्हणजे आज्ञापालन
-गुरूतत्व सेवक आदरणीय मार्गदर्शक श्री संतोष श्यामराव जोशी,दादा
(गुरूतत्व प्रतिष्ठांन संस्थापक, गुरुतत्त्व मासिक संपादक)