गुरुगीता

गुरुतत्त्वचार……..
२०/६/२०२०
*।। गुरुगीता प्रथम अध्याय ।।*
*अचिन्त्याव्यक्तरूपाय निर्गुणाय गुणात्मने* |
*समस्त जगदाधारमूर्तये ब्रह्मणे नमः ||*

*अर्थ:*’ *हे ब्रह्म अचिंत्य, व्यक्त,अव्यक्त या तिन्ही गुणांनी रहित, मात्र पाहण्याऱ्याच्या अज्ञानाच्या उपाधीने त्रिगुणात्मक भासतो. आणि संपुर्ण जगाचे अधिष्ठानरूप आहे . अशा ब्रह्मला नमस्कार असो* .।। १ ।।

*जय गुरूदेव……..*
*ब्रम्ह हे अचिंत्य आहे म्हणजे जे उत्पन्नही होत नाही. जे स्थिर ही नाही, जे कधीही लयास जात नाही. कुठल्याही पद्धतीने त्याचे चिंतन करून सुद्धा कळून येत नाही. असे अचिंत्य आहे.म्हणजेच चिंतनाच्या पलीकडे आहे.*
*तसेच अव्यक्त आहे, म्हणजेच कुठल्याही प्रकारे व्यक्त करू शकत नाही.असे त्याचे स्वरूप ,त्याचा रंग, त्याचा स्पर्श,त्याचे नाम व गंध या द्वारे व्यक्त करू शकत नाही. म्हणजेच शब्द, रूप, रस,गंध यांच्याही माध्यमातून व्यक्त करू शकत नाही असे हे ब्रह्म आहे.*
*ज्याप्रकारे अचिंत्य, अव्यक्त आहे. तसेच ते गुणरहित आहे. सत्व,रज,तम या त्रिगुणामध्ये त्याचे स्वरूप नाही. ब्रह्म स्वरूप हे निर्गुणस्वरूप आहे.* म्हणून तो सत्व,रज,तम या गुणांनी युक्त असा तो त्याचे आकलन होऊ शकत नाही ब्रम्ह निर्गुण स्वरूपात संपूर्ण ब्रह्मांड व्यापून आहे. तो सर्वत्र आहे.चराचरात सर्वत्र तोच व्यापून आहे.तो सर्वांमध्ये आहे. म्हणुनच त्याचे स्वरूप एक नाही.त्याला जसे कोणी ओळखत त्याला तिथे गेल्यावर तो तसाच दिसत असतो. मूळ आपल्या स्वरूपाची आपल्याला ओळख ज्यावेळी होत जाते. त्यावेळी ब्रह्मज्ञान व्हायला लागते. या ब्रह्म ज्ञानातूनच ब्रह्मानंद मिळतो
*ब्रह्म मात्र सर्व जगाचे संतुलन करीत असतो. तोच उत्पत्ती, स्थिती, लय कारक आहे. त्याच्या कडूनच या सर्व गोष्टी घडत असतात. त्याच्याच इच्छेने ब्रह्मांड कार्यरत आहे.तोच ब्रह्मांडाचा आधार रूप आहे. अशा या ब्रह्माला आमचा नमस्कार असो.*

हा गुरुगीतेचा प्रथम अध्यातील प्रथम श्लोक आहे. हे ब्रह्मतत्त्व म्हणजेच गुरुतत्त्व आहे.
जय गुरूदेव …….

Join the Conversation

11224 Comments